News Flash

कतरिनामुळेच रणबीरच्या करिअरचे वाजले तीनतेरा?

'हा चित्रपट केल्यानंतर मला कोणी काम देईल ही आशाच मी सोडून दिली होती. कदाचित माझं करिअर इथेच संपलं असं मला सारखं वाटत होतं'

रणबीर- कतरिना

‘जग्गा जासूस’चित्रपटाचं अपयश कतरिना आणि रणबीरच्या नात्यातील दुराव्याचं कारण बनलं अशा चर्चा बी टाऊनमध्ये होत्या. पण, एका मुलाखतीत हे अप्रत्यक्षरित्या मान्य करत रणबीरनंही या वृत्ताला काहीसा दुजोरा दिला आहे. कतरिनासोबत ‘अजब प्रेम की गजब काहानी’ या चित्रपटात रणबीरनं पहिल्यांदा काम केलं होतं. ‘हा चित्रपट केल्यानंतर मला कोणी काम देईल ही आशा मी कधीच सोडली होती. कदाचित माझं करिअर इथेच संपलं असं मला सारखं वाटत होतं’ असंही तो म्हणाला.

‘जग्गा जासूस’ चित्रपटामुळे तर मी दिवाळखोर झालोच पण माझं नातंही या चित्रपटामुळे तुटलं’ असंही रणबीर म्हणला. ‘मी मसाला चित्रपट करायलाच नको होता’ याचीही कबुली त्यानं दिली. केवळ कतरिनाच्या हट्टापायी रणबीरनं ‘जग्गा जासूस’मध्ये पैसे गुंतवले होते पण, हा चित्रपट चांगलाच आदळला त्यामुळे आर्थिक नुकसान तर रणबीरला सहन करावं लागलंच पण त्याचबरोबर समीक्षकांनीही त्याच्यावर बरीच टीका केली होती. या चित्रपटानंतर रणबीर कतरिनाच्या नात्यात कायमस्वरूपी दुरावा आला. रणबीरचं करिअर संपलं अशीही मतं अनेकांनी मांडली. त्यामुळे एकाअर्थानं करिअरचे तीनतेरा वाजण्यास रणबीरनं करतिनालाही जबाबदार धरलं आहे.

‘अजब प्रेम की गजब काहानी’ या चित्रपटामुळे रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमप्रकरणाला सुरूवात झाली. पण याच चित्रपटामुळे रणबीर आणि सलमान खानच्या नात्यातही वैमनस्य आलं. ‘अजब प्रेम की गजब काहानी’ नंतर रणबीर आणि कतरिनानं ‘राजनीती’ आणि ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातही काम केलं होतं पण या दोन्ही चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून लाभला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 11:52 am

Web Title: ranbir addmit he was screwed after working in masala pot with katrina
Next Stories
1 #InternationalYogaDay2018 : योगाभ्यासामुळे जीवनात आमूलाग्र बदल- अमृता खानविलकर
2 आयेशा टाकियाच्या पतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा
3 TOP 10: जावेद अख्तर यांच्या संतप्त ट्विटपासून संजय दत्तच्या आयुष्यातील ‘त्या’ प्रसंगापर्यंत
Just Now!
X