08 March 2021

News Flash

पहिल्यांदाच ‘कपल’ म्हणून समोर येणार रणबीर- आलिया

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट.

रणबीर कपूर, आलिया भट्ट

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. पण त्यापूर्वी दोघांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. डिनर डेट म्हणू नका किंवा मग साथीदाराच्या वाट्याला येणारं यश, रणबीर- आलिया प्रत्येक गोष्टीत एकमेकांची साथ देत आहेत. शूटिंगनंतरही फावला वेळ एकमेकांना देण्यासाठी प्राधान्य देत आहेत. आता पहिल्यांदाच ही जोडी एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट करणार आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आणि आलिया ‘वोग इंडिया’ या मासिकासाठी एकत्र फोटोशूट करणार आहेत. २९ ऑगस्टपासून मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ‘कपल’ म्हणून रणबीर- आलिया पहिल्यांदाच समोर येणार, असं म्हणायला हरकत नाही. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.

वाचा : बायोपिकमधून तोच तोच संघर्ष किती वेळा दाखवणार?- दीपिका पदुकोण

याआधी २०१३ मध्ये रणबीरने ‘पीपल’ PEOPLE या मासिकासाठी एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत फोटोशूट केलं होतं. त्यावेळी दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 4:11 pm

Web Title: ranbir kapoor and alia bhatt to shoot for their first joint magazine cover as a couple
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्यासाठी झाला मणिकर्णिकाच्या स्क्रिप्टमध्ये बदल
2 साराशी माझी तुलना का?, जान्हवी कपूरचा सवाल
3 ‘त्या’ पोस्टमुळे फरहान- शिबानीच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा
Just Now!
X