News Flash

विकी, रणबीर की शाहरुख कोण साकारणार अंतराळवीर राकेश शर्मांची भूमिका?

राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिकची गाडी काही केल्या पुढे जाईना.

गेल्या वर्षभरापासून अंतराळवीर राकेश शर्मा यांची बायोपीक चर्चेचा विषय ठरली आहे. आमिर, शाहरुख, प्रियांका, भूमी पेडणेकर अशा अनेक बड्या कलाकारांची नावं या चित्रपटाभोवती जोडली गेली. मात्र एकाही नावाची निश्चिती या चित्रपटासाठी झालेली नाही त्यामुळे राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिकची गाडी काही केल्या पुढे जाईना. आठवड्याभरापूर्वी अभिनेता विकी कौशलचं नाव राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आलं होतं. आता याच भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरचंही नाव चर्चेत आहे.

आमिर खान ही सर्वात पहिली पसंती राकेश शर्माच्या बायोपिकसाठी होती. मात्र काही कारणानं आमिर खाननं या बायोपिकसाठी नकार दिला. आमिरनं या भूमिकेसाठी शाहरूखचं नाव सुचवलं त्यानंतर काही महिन्यांपासून शाहरूख ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र ‘डॉन ३’ साठी शाहरुखनं हा बायोपिक सोडला असल्याचं म्हटलं जात आहे. पण चित्रपटाचे लेखक अंजूम राजाबली यांनी हे वृत्त खोडून काढलं होतं. शाहरुखनंतर विकीचं नावही चर्चेत आलं

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक्स’च्या यशामुळे अभिनेता विकी कौशलच्या लोकप्रियतेत वाढ झाली. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय दहा अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलनं स्थान मिळवलं. विकीनं आपल्या अभिनयानं निर्माते रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांचं मन जिंकलं, त्यामुळे राकेश शर्मा यांची बायोपिक ‘सारे जहाँ से अच्छा’मध्ये विकीची निवड करण्याचं निर्मात्यानं निश्चित केल्याचं समजत आहे. तर दुसरीकडे ‘संजू’ या चित्रपटाच्या यशामुळे रणबीरचा विचारही भूमिकेसाठी होत आहे. संजय दत्तची भूमिका साकारलेल्या रणबीरनंही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली होती. त्यामुळे आता राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल या दोघांचीही नावं शर्यतीत आहेत.

त्यामुळे राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी विकी, रणबीर की शाहरूखची निवड होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 5:37 pm

Web Title: ranbir kapoor may replace shah rukh khan in rakesh sharma biopic
Next Stories
1 प्रियांकानं दिलेला दगा विसरणं अशक्य, सलमाननं एकत्र काम करण्यास दिला नकार
2 ‘नेटफ्लिक्स’ला वेळीच रोखा अन्यथा.. स्टिव्हन स्पिलबर्गचा इशारा
3 या अभिनेत्रीला तैमुरसोबत जायचंय डेटवर
Just Now!
X