18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

अमिषामुळे रणबीरने पार्टीतून घेतला काढता पाय?

पार्टीमध्ये रणबीरने अमिषाशी बोलणं टाळलं

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 9, 2017 3:29 PM

अमिषा पटेल, रणबीर कपूर

बॉलिवूड पदार्पणातच अभिनेत्री अमिषा पटेलने ‘कहो ना प्यार है’, ‘गदर- एक प्रेम कथा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. मात्र त्यानंतर ती विशेष कामगिरी करु शकली नाही. एकेकाळी तिला मिळालेली प्रसिद्धीही हळूहळू कमी होऊ लागली. सध्या ती बॉलिवूडच्या कोणत्याही विशेष प्रोजेक्टमध्ये झळकत नाहीये. पण तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असते. तिचं वैयक्तिक आयुष्य, ब्रेकअप, लिंक- अप आणि पालकांशी भांडण यांशिवाय अमिषा आता आणखी एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आजकाल अमिषाला फक्त बॉलिवूड पार्ट्यांमध्येच पाहिलं जातं. या पार्ट्यांमध्ये तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी ती सेलिब्रिटींच्या मागे लागते असंही म्हटलं जातंय. यामुळे सेलिब्रिटीसुद्धा तिला वैतागले आहेत. कपूर घराण्यात नुकत्याच झालेल्या एका पार्टीदरम्यान अमिषाच्या कृत्यामुळे रणबीर कपूर ती पार्टी सोडून गेल्याची माहिती समोर येतेय.

वाचा : …म्हणून बिग बींना वाढदिवसाला कोणताही जल्लोष नकोय

‘डेक्कन क्रॉनिकल’च्या माहितीनुसार अमिषाला रणबीरशी काही वैयक्तिक चर्चा करायची होती. त्यासाठी ती सारखं रणबीरला विचारत होती. तिला नेमकं काय बोलायचे आहे हेच न समजल्याने आणि तिच्यापासून थोडं लांबच राहिलेलं बरं या अनुषंगाने रणबीर थेट पार्टीतून निघाला. रणधीर कपूर यांच्या सत्तराव्या वाढदिवासाच्या पार्टीमध्येही असाच काहीसा किस्सा झाला. त्यावेळी पार्टीमधील रणबीर आणि अमिषाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर दोघांच्या लिंक- अपच्याही चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर रणबीर अमिषापासून दोन हात लांबच राहणं पसंत करू लागला. या पार्टीमधून रणबीरने काढता पाय घेतल्यामागेसुद्धा हेच कारण असल्याचं म्हटलं जातंय.

First Published on August 9, 2017 3:29 pm

Web Title: ranbir kapoor run away from a party to avoid ameesha patel