News Flash

‘३ इडियट्स’मध्ये आमिरची जागा घेणार रणबीर?

रणबीरनं नुकतीच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आधी 'मुन्नाभाई चले अमरिका' या चित्रपटाचं काम मार्गी लावल्यानंतरच '३ इडियट'च्या चित्रिकरणाला

रणबीर कपूर

आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘३ इडियट’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचं राजकुमार हिरानी यांनी सांगितलं होतं. पण, हा चित्रपट कोणत्या साली प्रदर्शित होईल याची निश्चित माहिती देणं मात्र हिरानी यांनी टाळलं आहे. आता या चित्रपटात रँचो म्हणजेच आमिरची जागा कदाचित रणबीर घेऊ शकतो अशा चर्चा आहेत.

रणबीरनं नुकतीच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ‘संजू’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अफलातून अभिनय रणबीरनं केला. त्याच्या अभिनय कौशल्यानं हिरानीदेखील प्रभावित झाले आहेत त्यामुळे ‘३ इडियट’च्या सिक्वलमध्ये कदाचित रणबीर दिसू शकतो याची शक्यता निर्माण झाली आहे. मला ‘३ इडियट’च्या सिक्वलमध्ये काम करायला आवडेल. माझ्या वाट्याला लहान भूमिका आली तरी चालेल पण राजकुमार हिरानी यांच्यासोबत मला पुन्हा काम करायचं आहे अशी इच्छा रणबीरनं एका मुलाखतीत बोलून दाखवली.

लेखक अभिजीत जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची कथा लिहायला सुरूवात केली आहे. पण. आधी ‘मुन्नाभाई चले अमरिका’ या चित्रपटाचं काम मार्गी लावल्यानंतरच ‘३ इडियट’च्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे दुसरा रँचो कोण हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 5:40 pm

Web Title: ranbir kapoor want to be the part of 3 idiots sequel
Next Stories
1 हायकोर्टानं कामसूत्राचा दाखला देत स्तनपानाच्या फोटोविरोधातील याचिका फेटाळली
2 Video : ‘धडक है ना’वर थिरकले इशान-जान्हवी
3 Bigg Boss Marathi : ‘हुकूमशहा’ नंदकिशोरविरोधात प्रजा पुकारणार बंड
Just Now!
X