अभिनेता रणदीप हुड्डा आणि क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांचे नाव दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिच्या फेसबुक पोस्टवरून सुरू असलेल्या वादात गोवले गेले आहे. विरेंद्र सेहवागच्या ट्विटवर अभिनेता रणजीप हुड्डाने त्याची प्रतिक्रिया देताना पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये हसणाऱ्या काही चिन्हांचा वापर केला आहे. ज्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीकोनामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. हीच टीका पाहता रणदीप हुड्डाने त्याच्या फेसबुक वरुन आणखी एक पोस्ट करत त्याच्या ट्विटबद्दलची सारवासारव केली आहे. रणदीप हुड्डाच्या या फेसबुक पोस्टने पुन्हा एकदा अनेकांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये रणदीप हुड्डाने म्हटले आहे की, ‘प्रकरणाचे गांभीर्य समजत आपण फक्त सेहवागच्या हजरजबाबीपणाचेच कौतुक केले होते. माझ्या प्रतिक्रियेला थेट गुरमेहर प्रकरणाशी जोडले जाऊ नये’. असे म्हणत रणदीपने एक भली मोठी पोस्ट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Bat me hai Dum !#BharatJaisiJagahNahi pic.twitter.com/BNaO1LBHLH
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2017
?????? @virendersehwag ???? https://t.co/IcxuewcPMP
— Randeep Hooda (@RandeepHooda) February 26, 2017
गुरमेहर कौर हिने काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लक्ष्य केले होते. मी दिल्ली विद्यापीठात शिकते आणि मी अभाविपला घाबरत नाही, असा संदेश देणारी एक फेसबुक पोस्ट गुरमेहर कौरने टाकली होती. त्यावर गुरमेहर हिला बलात्काराच्या धमक्या आल्याचेही धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. गुरमेहरच्या वक्तव्याची सोशल मीडियावर काहींनी खिल्ली देखील उडवली होती. दरम्यान, विरेंद्र सेहवागने “मी, दोन त्रिशतकं ठोकलीच नाही, ती तर माझ्या बॅटने ठोकली”, असे उपहासात्मक ट्विट केले होते. सेहवागच्या या ट्विटचा थेट गुरमेहर कौर प्रकरणाशी संबंध जोडला गेला. ‘भारत जैसी जगह नही’ या हॅशटॅगसह सेहवागने ‘बॅट (बात) में है दम!’ या मथळ्यासह फोटो ट्विट केला होता. सेहवागच्या ट्विटचा रोख गुरमोहर कौर प्रकरणाकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आणि सेहवाग देखील टीकेचे केंद्रस्थान बनला. मात्र, सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देऊन या प्रकरणातून हात झटकले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. सेहवागच्या प्रतिक्रियेनंतर आता रणदीप त्याच्या या पोस्टबद्दल त्याचे स्पष्टीकरण दिले.