News Flash

रणवीरच्या प्रेम‘लीलां’ना चाप?

संजय लीला भन्साळीचा ‘राम-लीला’ हा चित्रपट तिकीटबारीवर फारशी चमकदार कामगिरी दाखवू शकला नसला तरी रणवीरसिंग आणि दीपिका पडुकोण यांच्यातील ‘केमिस्ट्री’ जुळण्यात या चित्रपटाने मोठा हातभार

| May 22, 2014 12:55 pm

संजय लीला भन्साळीचा ‘राम-लीला’ हा चित्रपट तिकीटबारीवर फारशी चमकदार कामगिरी दाखवू शकला नसला तरी रणवीरसिंग आणि दीपिका पडुकोण यांच्यातील ‘केमिस्ट्री’ जुळण्यात या चित्रपटाने मोठा हातभार लावला. एरव्ही मोकळाढाकळा असलेला रणवीर तेव्हापासून दीपिकाविषयी भरभरून बोलायला लागला. कोणत्याही व्यासपीठावरून दीपिकावर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. आता मात्र हाच बोलबचन रणवीर एकदम चूप झाला आहे. दीपिकानेच त्याच्या वाचाळपणाला लगाम घातलेला दिसतो. कारण सध्या प्रेमाबद्दल एक शब्द जरी उच्चारला तरी तो सावध होतो आणि थेट दीपिकाविषयी विचारले तर मग तो सरळ मुद्दाच संपवून टाकतो.
दीपिकाच्या अखंड प्रेमात बुडालेल्या रणवीरने सुरूवातीला मनमोकळपणे आपल्या भावना प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त के ल्या होत्या. मात्र, दीपिकाने यावर मिठाची गुळणी बाळगणेच पसंत केले होते. रणवीरच्या मनमोकळेपणाचा कहर झाला तेव्हा मात्र दीपिकाने शांतपणे माध्यमांना या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मध्यंतरी अ‍ॅवॉर्ड सोहळ्यादरम्यानही रणवीरने जाहीरपणे रंगमंचावर दीपिकाची स्तुती केली पण, तिने त्याला प्रतिसाद देणे टाळले. केवळ दीपिकाच नव्हे तर एकू णच आपल्या बेछूट वागण्याला बॉलिवूडवाले नाक मुरडतात, हे लक्षात आल्याने असेल पण, रणवीरने दीपिकाच नव्हे तर सगळ्याच विषयांवर सावधपणे, विचारपूर्वक उत्तर द्यायला सुरूवात के ली आहे. तरीही रणवीरवर होणारा दीपिकाबद्दलच्या प्रश्नांचा मारा कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने दीपिका आपल्याला खूप आवडते, तिच्याबरोबर फिरणे-खाणे-पिणे करायला आवडते. पण, म्हणून तुम्ही आमच्याबद्दल कुठल्याही निष्कर्षांवर पोहोचलेच पाहिजे, असे नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या कंडोमच्या जाहिरातीबद्दल छेडल्यावरही लैंगिक आरोग्य चांगले राहणेही तितकेच आवश्यक असते हे सहज एक दिवस माझ्या लक्षात आले. मी स्वत: जाहिरात क रू शकतो, असे वाटले म्हणून मी ती जाहिराती केली, असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:55 pm

Web Title: ranveer singh avoid to talk on deepika padukone
Next Stories
1 ‘आयपीएल’ चित्रपटाच्या गाण्याचे बेला शेंडेच्या आवाजात ध्वनिमुद्रण
2 अभिनेत्री श्रुती हसनची पोलिसांत तक्रार
3 ‘गे’ प्रेमकथेवर आधारित चित्रपटांसाठी बॉलिवूड सज्ज- सोनम कपूर
Just Now!
X