04 March 2021

News Flash

राणी पद्मावतीला मल्लिका म्हटल्याने ट्रोल झाला रणवीर

पब्लिसिटी स्टंट म्हणत नेटीझन्सनी रणवीरवर केली टीका

रणवीर सिंग

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा फर्स्ट लूक गुरुवारी प्रदर्शित झाला. चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्टर शेअर केला आहे. मात्र या पोस्टरसोबतच त्याने लिहिलेल्या कॅप्शनमुळे तो ऑनलाइन ट्रोलचा शिकार झाला.

या चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे. लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर भरजरी दागिने घातलेली दीपिका हात जोडून उभी असलेली एका पोस्टरमध्ये तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तिचा संपूर्ण शाही लूक पाहावयास मिळतो. एक पोस्टर शेअर करत रणवीरने कॅप्शनमध्ये ‘मल्लिका-ए-चित्तोड, पद्मावती’ असं लिहिलं. या कॅप्शनमुळेच ट्विटरकरांचा राग अनावर झाला. पद्मावतीला मल्लिका नाही तर महाराणी म्हटलं पाहिजे असं काही ट्विटर यूजर्सने म्हटलं. तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत रणवीरवर जोरदार टीका केली.

वाचा : …अन् सनी तिच्यावर भडकली

सोशल मीडियावर जितक्या सहजतेने मतं व्यक्त केली जातात तितक्याच सहजतेने नेटिझन्सकडून ट्रोल होण्याचीही शक्यता असते. जेव्हा तुम्ही सेलिब्रिटा असता तेव्हा सोशल मीडिया अधिक काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे असते. आता यावर रणवीर सिंग काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, दीपिका, रणवीर, शाहिदची ऐतिहासिक भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल. व्हायकॉम १८ पिक्चर्स आणि भन्साळी प्रॉडक्शन्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Next Stories
1 …अन् सनी तिच्यावर भडकली
2 माझी बायको मला जोड्याने मारते- संजय दत्त
3 करिश्मा स्टाईलने करिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Just Now!
X