अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अफलातून एनर्जीने सर्वांची मने जिंकतो. काहीतरी नवीन करण्यामध्ये तो कधीच मागे हटत नाही. मग एखादी आव्हानात्मक भूमिका असो वा हटके ड्रेसिंग. यावेळीही रणवीर त्याच्या हटके गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सध्या तो एक रॅप साँग लिहण्यात व्यस्त आहे. लवकरच हे गाणे प्रदर्शित होणार असल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर लिहत असलेल्या गाण्यास तो स्वत:च गाणार असून त्या व्हिडिओत अभिनयही करणार आहे. याआधी रणवीरने त्याच्या ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसाठी रॅप लिहले होते. प्रेक्षकांवर तिच जादू पुन्हा एकदा चालवण्याच्या प्रयत्नात सध्या रणवीर गुंतला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ अभिनेता सध्या आगामी ‘बेफिक्रे’ चित्रपटाचे पोस्टर्स आणि त्याची सहकलाकार वाणी कपूर हिच्यासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे. तसंही रणवीर त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. नुकताच झालेल्या जीक्यू पुरस्कार सोहळ्यात तो वेगळ्या अंदाजात दिसला होता. रणवीरने केलेला अतरंगी पोशाख, त्याचं बोलण या सगळ्याच गोष्टींमुळे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या होत्या. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हाने तिचे वडिल आणि ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिकेसाठी रणवीरला पसंती दिली होती.
सोनाक्षी सिन्हा म्हणालेली की, माझ्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग योग्य अभिनेता आहे. सोनाक्षी आणि रणवीर यांनी ‘लुटेरा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याआधी शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले की, जर माझ्यावर बायोपिक करण्यात आला तर त्यात माझ्या भूमिकेत मला रणवीरला पाहायला आवडेल.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2016 रोजी प्रकाशित
यो यो रणवीर सिंग!
रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अफलातून एनर्जीने सर्वांची मने जिंकतो.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 01-10-2016 at 16:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh is back to rapping and we cannot wait for the song