20 January 2019

News Flash

‘आयटमगिरी’ करत डॅनी सिंगचे मराठी रॅप साँग

मराठीत रॅपसाँगचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे

डॅनी सिंग

पंजाबी, हिंदी शब्दांचा सुरेख मेळ साधत त्याला काहीसा पॉप बाज देत बादशाह त्याची अशी काही मांडणी करतो की अनेकजण त्याच्या या अंदाजावर फिदा होतात. त्यातही गेल्या काही वर्षांपासून रॅप, रॉक, पॉप या संगीत हनी सिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या युवा पिढींमध्ये जास्त क्रेज पाहायला मिळत आहे.

पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार आपल्या भारतात आता चांगलात रुळताना दिसत आहे. आजच्या संस्कृतीला आणि तरुणाईला लागलेले रॅपसॉंगचे हे वेड मराठीतही येऊ घातले आहे. विशेष म्हणजे, नवनवीन प्रयोग आणि संकल्पना आत्मसात करण्यात नेहमीच तत्पर असलेल्या आपल्या मराठी इंडस्ट्रीत देखील रॅपिंगचा हा फंडा चांगलाच गाजतो आहे.

मराठीत सध्या गाजत असलेले ‘आयटमगिरी’ हे रॅपसाँग त्यातीलच एक म्हणावे लागेल. डॅनी सिंग याने गायलेले हे रॅपसाँग तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडत आहे. मराठी- हिंदी फ्युजन असलेले हे गाणे, प्रत्येकाच्या तोंडी चांगलेच रुळलेले दिसून येत असून, ‘आयटमगिरी’ या व्हिडीयो साँगच्या निमित्ताने मराठीत रॅपसाँगचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अर्थात यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये याचा वापर केला असला तरी, एक संपूर्ण गाणे ‘रॅप’ मध्ये गाण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. एस. के. व्हिजन्स निर्मित आणि इंद्रनील नुकडे दिग्दर्शित या रॅपसाँगला आशिष किशोर यांनी ताल दिला आहे. याशिवाय, हे गाणे अधिक रेखीव करण्यासाठी सहदिग्दर्शक ऐश्वर्या जैन आणि स्नेहल उभे यांनीही विशेष मेहनत घेतली आहे. तरुणाईला विशेषत: बॅचलर्सना भुरळ पाडणाऱ्या या रॅपसाँगला नेटीझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, हे साँग लवकरच प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल, यात शंका नाही.

First Published on January 25, 2017 1:11 pm

Web Title: rapper danny singh marathi rap song