07 December 2019

News Flash

मुलीच्या जन्मदिनी हा रॅपर करुन घेतो व्हर्जिनिटी टेस्ट

एका शो दरम्यान रॅपरने हा खुलासा केला आहे.

सध्या अमेरिकन रॅपर आणि अभिनेता टीआयची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चा टीआयने मुलीशी संबंधीत केलेल्या एका खुलास्यामुळे सुरु झाल्या आहेत. टीआय वर्षातून एकदा मुलीची व्हर्जिनिटी टेस्ट करुन घेत असल्याचा खुलासा त्याने एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

टीआयने नुकताच पोडकास्ट शो ‘लेडीज लाइक अस’मध्ये हजेरी लावली होती. दरम्यान त्याला तु मुलीसोबत सेक्स बद्दल उघडपणे बोलतोस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर टीआयने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘माझी मुलगी डेजा हॅरिस (Deyjah Harris)च्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तिची व्हर्जिनिटी टेस्ट करुन घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. ते डॉक्टर त्यांच्या कामात अगदी प्रामाणिक होते. मुलीच्या परवानगी शिवाय मला ही माहिती दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितले’ असे टीआय म्हणाला.

‘त्यानंतर मी डेजाला प्रश्न विचारला की तुला ही माहिती माझ्या पासून लपवून ठेवायची आहे का? त्यावर डेजाने डॉक्टरांसमोर मला माहिती देण्याची परवानगी दिली. डॉक्टरांनी ही माहिती शेअर करण्यासंदर्भात माझ्या मुलीच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या. डेजा आता १८ वर्षांची आहे आणि ती व्हर्जिन आहे’ असे टीआय पुढे म्हणाला.

टीआयला त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच सुनावण्यात आले आहे. ‘दरवर्षी एक पालक म्हणून तिचा वाढदिवस साजरा करायला हवा, ही एक लज्जास्पदबाब आहे’ असे म्हणत नेटकऱ्यांनी टीआयवर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने तर ‘महिला या कुणाच्या मालमत्ता नसतात. मग ती मुलगी असो किंवा पत्नी’ असे खडेबोल टीआयला सुनावले आहे.

First Published on November 7, 2019 6:23 pm

Web Title: rapper ti annually conduct his 18 year old daughter virginity test avb 95
Just Now!
X