News Flash

बिकिनी फोटोशूटवर रश्मी देसाईने केला खुलासा; म्हणाली “असे कपडे तर…

"मला इमेज बदलण्याची गरज नाही"

मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रश्मी देसाई गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. रश्मी गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक बोल़्ड फोटो शेअर करतेय. त्यातच रश्मीने शेअर केलेल्या बिकिनीतील फोटोमुळे सोशल मीडियावर तिने धुमाकुळ घातला होता. मालिकांमध्ये साध्या भोळ्या रुपात दिसणाऱ्या रश्मीचा हा बोल्ड अवतार पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. रश्मी देसाईमध्ये मोठा बदल झाल्याचं म्हणत काही चाहते रश्मीच्या या नव्या लूकला पसंती देत आहेत तर काहींनी तिला ट्रोलही केलं. रश्मीने मात्र आपल्यात कोणताच बदल झाला नसल्याचं म्हंटलं आहे.

नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने बिकिनीशूटमुळे तिच्या इमेजमध्ये झालेल्या बदलांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत रश्मी म्हणाली, ” मला वेगवेगळ्या स्टाइल करून बोल्ड फोटोशूट करण्याची कायमच आवड होती. आता फक्त लोक माझ्या लूककडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. ” पुढे ती म्हणाली, “मला याचा कायम आनंद होतो की प्रेक्षक मला माझ्या सगळ्या शोमध्ये मोठी पसंती देतात. मी याआधी देखील बोल्ड फोटोशूट केलं आहे. मला आठवतंय खूप पूर्वी मी एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. मला वाटलं हे माझं शरीर आहे आणि ते खूप सुंदर आहे. मी त्याकडे कसं पाहते ते महत्वाचं आहे. ” असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

या मुलाखतीत रश्मी म्हणाली आहे की तिला कोणत्याही प्रकारची प्रतिमा बदलण्याची आवश्यकता नाही. शिवाय आधी ती जे करत होती तेच आताही करतेय असं तिने नमूद केलं. ती म्हणाली,” माझी कोणतीही प्रतिमा बदलण्याची आवश्यकता मला कधीही वाटली नाही. मला वाटतं मी जबरदस्त कपडे घालते. खरं तर कपडे आणि दागिन्य़ाकडे मी कायम लक्ष देते. मात्र लोक कदाचित आता त्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. असं ती म्हणाली.

रश्मीने नुकतेच काळ्या रंगातील बिकिनीतले फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 11:28 am

Web Title: rashami desa breaks silence on her bikini photoshoot said she does not need to change any image kpw 89
टॅग : Entertainment
Next Stories
1 Video: सेल्फी काढायला आला अन् अभिनेत्रीला केलं किस
2 ‘तू कोण आहेस…’, ईशान खट्टरवर आई नीलिमा संतापली
3 बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘त्या’ युजरला नव्या नंदा म्हणाली…
Just Now!
X