15 December 2019

News Flash

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनिलचे हे गाणे ऐकले का?

रसिकाला अभिनायासोबतच गाण्याची आवड असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. या मालिकेतील शनाया या पात्रामुळे रसिका खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. नुकताच रसिकाचा गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका तिचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’मधील गाणे गाताना दिसत आहे.

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातील नुकताच प्रदर्शित झालेले ‘कोडे सोपे थोडे’ हे गाणे तिच्या गोड आवाजात गाताना दिसत आहे. रसिकाला अभिनायासोबतच गाण्याची आवड असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘कोडे सोपे थोडे’ हे गाणे श्रृती आठवलेने गायले असून क्षितिज पटवर्धनने लिहिले आहे.

सध्या रसिका तिचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’च्या प्रमोशन व्यग्र आहे. या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार असून रसिका सुनिल, ईशा केसकर इत्यादी कलाकारदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on July 16, 2019 6:07 pm

Web Title: rasika sunil singing video viral avb 95
Just Now!
X