News Flash

पुन्हा ‘शनाया’ची भूमिका साकारण्याबद्दल रसिका म्हणते…

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रसिका सुनील पुन्हा शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ लॉकडाउननंतर ही मालिका लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या मालिकेतील जुनी शनाया आता परत दिसणार आहे. रसिका सुनील पुन्हा एकदा शनायाची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुन्या शनायाची एण्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. रसिकाने दोन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत शनाया हे पात्र साकरण्याबाबत एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘मी दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकेच्या सेटवर आले असं मला वाटलच नाही. सुरुवातीला मी ज्या गोष्टी लक्षात ठेवून शनाया हे पात्र साकारले होते तसेच आता देखील साकारत आहे. आधी पासून मी संपूर्ण टीमला ओळखत होते आणि त्यांच्याशी माझे चांगले बाँडिग होते त्यामुळे आता मला अवघड वाटले नाही’ असे ती म्हणाली.

जेव्हा या भूमिकेसाठी मला पुन्हा विचारण्यात आले तेव्हा मी आनंदी झाले आणि मी होकार कळवला. लॉकडाउन नंतर पुन्हा प्रेक्षकांच्या समोर येताना आनंद होत असल्याचे तिने पुढे म्हटले आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रसिका सुनीलने सुरुवातीला शनाया हे सर्वांचे आवडते पात्र साकारले होते. या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली होती. पण शिक्षणाकरीत परदेशात जायचे असल्यामुळे तिने मालिका सोडली. त्यानंतर शनाया हे पात्र अभिनेत्री ईशा केसकरने साकारले. मात्र तिच्या दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे तिला दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे शक्य होत नव्हते. तसेच मालिकेचे शूटिंगसुद्धा थांबवता येणार नव्हते. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता मालिकेत पुन्हा रसिका सुनील शनाया हे पात्र साकारणार आहे.

१३ जुलै पासून माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाउननंतर या मालिकेत काय वेगळं पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रसिकाला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:14 pm

Web Title: rasika sunil talks about rejoining mjha navryachi bayko serial avb 95
Next Stories
1 कधीकाळी ऋषी कपूर यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू कपूर लिहायच्या प्रेमपत्र?
2 पावसाला थांबवण्यासाठी अभिनेत्री झाली ‘रेन पोलीस’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरमध्ये सुशांतने घातलेल्या टी-शर्टने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
Just Now!
X