06 December 2019

News Flash

‘रात्रीस खेळ चाले २’मधील सरिताबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

..जेव्हा प्राजक्ताला सरिताच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा आला होता कॉल

प्राजक्ता वाडये

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत फार मोठा बदल केला. मराठी मालिकांच्या इतिहासात पहिल्यांदाच या मालिकेने प्रीक्वल सादर केला. सहसा मालिकेचा दुसरा सिझन म्हणजे त्याचा सीक्वल असतो. पण ‘रात्रीस खेळ चाले २’ने ही प्रथा मोडून काढली असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेतील शेवंता, सरिता आणि काशी या भूमिका चांगल्याच लोकप्रिय आहेत. तर मालिकेत सरिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता वाडये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली तरी फेसबुकवरील प्राजक्ताचे काही फोटो पाहून तिच्या मॉडर्न लूकचा अंदाज येतो.

प्राजक्ताला जेव्हा सरिताच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होता. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘सरिताच्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला, तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. कणकवली हे माझं गावच आहे आणि मालवणी भाषा मला उत्तम येते. भूमिकेची मूळ गरज भाषा हीच होती.’

वाचा : रात्रीस खेळ चाले : दत्ताच्या बायकोचा हा लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

प्राजक्ता पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याआधी तिने फक्त सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. याविषयी ती पुढे सांगते, ‘गर्ल्स हॉस्टेल, १०० डेजमध्ये मी भूमिका साकारल्या. पण त्या महत्त्वपूर्ण नव्हत्या. इतकंच नव्हे तर मी रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्येही महिला पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती.’

रिअल आणि रिल लाइफमधील फरक सांगताना ती पुढे म्हणाली, ‘खऱ्या आयुष्यातही मी सरितासारखी साधी आणि सरळ आहे. पण विचारांच्या बाबतीत मी थोडी पुढारलेली आहे. मला पारंपरिक कपड्यांसोबतच मॉडर्न पोशाखसुद्धा आवडतो.’

प्राजक्ताला अभिनयासोबतच गायनाची फार आवड आहे. तिने संगीताचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे. प्राजक्ताने दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या ‘नदी वाहते’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे.

First Published on April 19, 2019 3:42 pm

Web Title: ratris khel chale 2 actress prajakta wadaye aka sarita reveals her lesser known side
Just Now!
X