बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांची भेटीला आली. मात्र, ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या सीरिजवर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता अभिनेता रवि किशन यांनी ‘तांडव’वर कडाडून टीका केली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“कृपा करुन निदान आमच्या देवाला तरी सोडा. या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला त्रास होतो. कोट्यवधी कमावण्यासाठी आमच्या देवाला हीन दर्जा देऊ नका. हात जोडून तुम्हाला विनंती आहे”, असं रवि किशन म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
वाचा : भडकलेल्या सैफनं फोटोग्राफर्सला दाखवला बाहेरचा रस्ता, कारण…
दरम्यान, अलिकडेच अमेझॉन प्राइमवर ‘तांडव’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकला आहे. या सीरिजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच अनेक ठिकाणी सीरिज व निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 11:04 am