19 September 2020

News Flash

‘अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज’

मला यात काहीच वावगं वाटत नाही.

अनिल कपूर

बॉलिवूडचा ‘झक्कास’ अभिनेता अनिल कपूर आगामी ‘रेस ३’ चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘रेस’ सीरिजमधील प्रत्येक चित्रपटात अनिलने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

वाचा : अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

‘रेस’ सीरिजमधील ‘रेस ३’ची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. यावेळी सैफऐवजी सलमान खान ‘रेस’मध्ये दिसणार आहे. मात्र, अनिलने चित्रपटातील त्याचे स्थान यावेळीही कायम राखले आहे. या चित्रपटात तू सलमानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेस, असे अनिलला विचारले असता तो म्हणाला की, मला यात काहीच वावगं वाटत नाही. एक अभिनेता म्हणून मी अमितजींच्या (अमिताभ बच्चन) वडिलांचीही भूमिका साकारायला तयार आहे. करारानुसार मी चित्रपटाविषयी अधिक काही सांगू शकत नाही. पण, ‘रेस ३’ची कथा पूर्णपणे वेगळी असेल याची मी खात्री देतो. नुकतेच अनिलने ‘फन्ने खान’चे चित्रीकरण पूर्ण केले. यात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चनचीही प्रमुख भूमिका आहे.

वाचा : गरोदर असतानाही चित्रीकरण केले, स्मृती इराणींनी सांगितल्या मालिका विश्वातील अडचणी

‘इंडस्ट्रीमध्ये माझे प्रत्येकाशीच चांगले संबंध आहेत. ‘फन्ने खान’मध्येही ऐश्वर्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. चित्रपटातील माझ्या भागाचे चित्रीकरण मी शुक्रवारीच पूर्ण केले. आता केवळ २-३ गाण्यांचे चित्रीकरण बाकी आहे’, असेही अनिल म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 10:57 am

Web Title: ready to play amitabh bachchans father says anil kapoor
Next Stories
1 Happy Birthday Dilip Kumar: अशोक कुमार यांनी दिली होती दिलीप कुमार यांना पहिली संधी
2 अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
3 सिने’नॉलेज’ : नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?
Just Now!
X