News Flash

प्रदर्शनापूर्वीच दिशा- टायगरचा चित्रपट ठरतोय हिट

३० मार्च रोजी प्रदर्शित होतोय 'बागी २'

दिशा पटानी, टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनापूर्वीच ‘बागी २’ हिट ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती समोर येत आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली तर आता सिक्वलमध्ये बॉलिवूडची बहुचर्चित दिशा- टायगरची जोडी पाहायला मिळणार आहे. एकीकडे या दोघांची केमिस्ट्री, टायगरचा अॅक्शन अवतार, भरपूर साहसदृष्ये या सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘मुस्लिमांनी कृष्णाची भूमिका साकारणं गैर’, आमिरच्या चित्रपटावरून ‘महाभारत’

कमाईचा विचार केला असता पहिल्या आठवड्यात हा चित्रपट बाजी मारेल अशी शक्यता आहे. कारण अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती देशभरात विस्तार असलेल्या मल्टिप्लेक्सचे सीईओ (विशेष कार्यकारी अधिकारी) गौतम दत्ता यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ट्रेलर असो किंवा ‘एक दो तीन’ या माधुरीच्या गाण्याचा रिमेक, या चित्रपटाला मौखिक प्रसिद्धीचाही चांगला फायदा होणार अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. साजिद नाडियादवाला निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज बाजपेयी, प्रतीक बब्बर, रणदीप हुडा आणि दिपक डोब्रियाल यांच्याही भूमिका आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:46 pm

Web Title: record advance bookings for tiger shroff disha patani baaghi 2
Next Stories
1 लग्नात नवरदेवाचा प्रताप पाहून अमिताभ बच्चन यांना हसू अनावर
2 कतरिनाचा विषय निघताच सलमान म्हणतो….
3 MTV Roadies फेम रघू रामच्या आयुष्यात परतलं प्रेम
Just Now!
X