14 December 2019

News Flash

Video : बिग बींचा फोटो पाहताच रेखा यांची ‘ती’ प्रतिक्रिया आजही खळखळून हसण्यास पाडते भाग

रेखा यांची ती प्रतिक्रिया कॅमेरामनने अचूकरित्या टिपली.

रेखा

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची आणि रेखा यांची प्रेमकहाणी साऱ्यांनाच ठाऊक आहे. कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांच्या नात्यामध्ये काही कारणास्तव दुरावा आला. त्यातच अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या नात्यात दुरावा आला. तेव्हापासून आजतायागत या दोघांच्या नात्यातील हा दुरावा कायम आहे. अमिताभ बच्चन यांचे स्वतःचे आनंदी कुटुंब आहे, तर दुसरीकडे रेखा मात्र आजही एकट्याच आहेत. काही महिन्यांपूर्वी रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आजही तुम्हाला खळखळून हसण्यास भाग पाडेल.

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रत्नानी यांच्या कॅलेंडर लाँचिंग कार्यक्रमावेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र या सा-यांमध्ये रेखा यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. डब्बु रत्नानी यांनी सेलिब्रिटींना फोटो काढण्यासाठी एक खास जागा तयार केली होती. याठिकाणी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते नवोदित कलाकारांपर्यंत साऱ्यांचे फोटो लावण्यात आले होते. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी फोटो काढून घेतले. त्यानंतर रेखा यादेखील डब्बू रत्नानी आणि त्यांच्या मुलांसह फोटो काढण्यासाठी या ठिकाणी आल्या. प्रथम रेखा यांनी डब्बु आणि त्यांच्या मुलांसह काही फोटो काढले. त्यानंतर मात्र त्यांचा सोलो फोटो काढण्याची वेळ आली. यावेळी त्यांच्या मागे अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहताच त्यांनी या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथून निघून गेल्या. विशेष म्हणजे काही झालंच नाही अशा आविर्भावात त्या वावरत होत्या. मात्र काही काळासाठी त्या गोंधळल्या होत्या हे मीडियाच्या कॅमेराने कैद केलं.

First Published on October 10, 2019 1:39 am

Web Title: rekha hilarious reaction while posing in front of amitabh bachchan photo is still made us laugh ssv 92
Just Now!
X