प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटांसारखा नृत्यावर आधारित चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षितबरोबर करण्याची इच्छा कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डी’सूजाची आहे.
रेमो म्हणाला, मी एका चित्रपटावर काम करतो आहे, जो मला माधुरीबरोबर करण्याची इच्छा आहे. हा चित्रपट ‘नवरंग’ आणि‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटांसारखा नृत्यावर आधारित चित्रपट असेल. मी फक्त माधुरीसाठी या चित्रपटाच्या कथेचे लेखन करीत आहे. चित्रपटाच्या कथेचे लेखन पूर्ण करून लवकरात लवकर चित्रपटावर काम सुरू करायचे आहे. माझ्या चित्रपटात काम करण्यास माधुरी होकार देईल, अशी मला आशा आहे.
रेमो आणि माधुरी डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा’च्या मागील तीन सिझनपासून पंच म्हणून एकत्र काम करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 4:39 am