बी -टाऊनमध्ये सध्या ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दिपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. या दोघांच्याही घरी सध्या लगीनघाई पाहायला मिळत असून ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दिपिका-रणवीरने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या दरम्यानच दिपिकाने ‘डीएनए’ वृत्तपत्राला एक मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरबाबतचा एक धक्कादायक खुलासा केला आहे.

यशाचं शिखर सर करणाऱ्या दिपिकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात २००६ पासून केली होती. नवोदित अभिनेत्रीपासून नावाजलेली अभिनेत्री होईपर्यंतचा प्रवास करताना दिपिकाच्या वाट्याला अनेक खाचखळगे आले. तिचा हा जीवनप्रवास तिने मुलाखतीमध्ये उलगडला असून यावेळी तीने एका धक्कादायक माहिती उघड केली आहे.

दिपिकाच्या उमेदीच्या काळामध्ये एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्यासाठी तिला अनेकांनी सल्ले दिले होते. दिपिकाला मिळत असलेल्या या सल्ल्यांमुळे तिला नैराश्य आल्याचं तिने यावेळी सांगितले. एक यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी तिला फिगर मेंटेन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दिपिकाला देण्यात येणा-या सल्ल्यामुळे ती नैराश्याच्या गर्ततेत गेली होती. शुन्यात नजर हरविलेल्या दिपिकाने आत्महत्या करण्याचाही निर्णय घेतल्याचा धक्कादायक खुलासा तिने या मुलाखतीत केला.

पुढे बोलताना ती म्हणाली, नैराशग्रस्त झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी मला माझ्या जीनशैलीमध्ये बदल करावा लागला होता.त्याप्रमाणेच मी मेडिटेशनचाही आधार घेतला. या सा-या प्रयत्नातून हळूहळू बाहेर पडल्यानंतर मला समाजामध्ये नैराशग्रस्त लोकांसाठी काही तरी करण्याचा विचार डोक्यात आला आणि मी त्या दिशेने वाटचाल सुरु केली. २०१४मध्ये लिव लव लाफ या  फाउंडेशनची सुरुवात केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून नैराश्यात गेलेल्या लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी मी माझ्या आयुष्यातील काही अनुभवदेखील त्यांच्याबरोबर शेअर केल्याचं ती म्हणाली. दरम्यान, या सा-यातून बाहेर पडलेल्या दिपिकाने तिच्या करिअरचा आलेख कधीच खाली जाऊ दिला नाही. तिच्या यशाचा आलेख कायमच उंच राहिल्याचं दिसून आलं.