प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चांगलंच महागात पडलं. महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर केल्यानंतर नेटीझन्सनी रिया आणि महेश भट्ट यांना ट्रोल केलं. इतकंच नव्हे तर अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्याशीही त्यांची तुलना केली. यावर आणखी एक फोटो शेअर करत रियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे? इथे सीतेलासुद्धा बदनाम करण्यात आलं. ट्रोल करणाऱ्यांनो तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं,’ असं कॅप्शन देत रियाने महेश भट्ट यांच्यासोबत आणखी एक फोटो शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महेश भट्ट यांच्या आगामी ‘जलेबी’ या चित्रपटात रिया मुख्य भूमिका साकारत आहे. रिया आणि महेश भट्ट यांची तुलना अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीनशी करत तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का असा सवाल काही युजर्सनी केला होता. सध्या ‘बिग बॉस १२’मुळे अनुप- जसलीन ही जोडी खूप चर्चेत आहे. दोघांच्या वयातील ३७ वर्षांच्या अंतरामुळे ही जोडी चर्चेत आहे.