अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असतानाच सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांसोबतच पाटणा पोलिसांनी देखील सुरु केली आहे. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्तीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

पाटणा पोलीस अधिकारी विनय तिवारी यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “रिया फरार झालेली नाही. गरजेनुसार पोलीस तिच्याशी संपर्क साधतील. सध्या आम्ही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत आहोत. तसेच आतापर्यंत ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत, त्यांची पुर्नतपासणी सुरु आहे. आम्ही लवकरच ही केस सॉल्व्ह करु असा आम्हाला विश्वास आहे. पण तो पर्यंत कुठल्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात मंगळवारी रात्री पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.