News Flash

विद्या बालनं ट्रोलर्सवर भडकली; रियावर टीका करणाऱ्यांना केला सवाल

सुशांत मृत्यू प्रकरण: विद्या बालनने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्रीने विद्या बालनला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. जो पर्यंत ती निर्दोष आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला दोषी समजणार का? असा सवाल तिने टीकाकारांना विचारला आहे.

“खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया

“सुशांतचा मृत्यू ही अत्यंत दुदैवी घटना आहे. मात्र माध्यमांनी या प्रकरणाला आता जणू सर्कसच बनवले आहे. एक महिला म्हणून रियाला पाहून मला खूप दु:ख होतं. तिच्यावर वाट्टेल तशी टीका केली जात आहे. जो पर्यंत ती निर्दोष आहे असं सिद्ध होत नाही तो पर्यंत तुम्ही तिला दोषी समजणार का?” अशा आशयाचं ट्विट करुन विद्या बालनने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…

सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 2:18 pm

Web Title: rhea chakraborty vidya balan sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 “हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना”; सिद्धार्थनं केलं मदतीचं आवाहन
2 मोदी-निर्मित संकटं दाखवणाऱ्या राहुल गांधींना बॉलिवूड दिग्दर्शकाचा टोला; म्हणाले…
3 सुशांतसह साराने केली होती बँकॉक ट्रीप?
Just Now!
X