बॉलीवूड अभिनेता सुशातं सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत आहे. त्यातच मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, त्यावरुन सुशांतच्या चाहत्यांना या प्रकरणामध्ये काहीतरी लपवलं जात असल्याची शंका येत आहेत. सध्या ईडी आणि सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या नवीन माहितीनुसार सुशांतच्या दोन्ही कंपन्यांचं रजिस्ट्रेशन रिया चक्रवर्तीचे वडिल इंद्रजीत यांच्या फ्लॅटच्या पत्त्यावर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, तर मग एका बंद फ्लॅटच्या पत्त्यावर कंपनीचं रजिस्ट्रेशन का केलं गेलं? याची चौकशी आता ईडीमार्फत केली जात आहे.

…तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांतने दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यापैकी एका कंपनीचं रजिस्ट्रेशन सप्टेंबर २०१९मध्ये आणि दुसऱ्या कंपनीचं जानेवारी २०२०मध्ये केलं होतं. स्केअर फीट इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही कंपन्यांचं रजिस्ट्रेशन इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या फ्लॅटच्या पत्त्यावर करण्यात आलं आहे. ऑक्टोंबर २०११ मध्ये नवी मुंबईतील साई फॉर्च्यून या सोसायटीमध्ये रियाच्या वडिलांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत ५३ लाख रुपये होती. २०१६ मध्ये त्यांना या प्लॅटचं पजेशन मिळालं होतं. हा प्लॅट गेल्या आठ वर्षांपासून बंदच आहे. या फ्लॅटचा वापर राहण्यासाठी कधीही केलेला नाही. शिवाय सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार सुशांतला या फ्लॅटबद्दल काहीच माहित नव्हतं. मात्र दोन्ही कंपन्यांचं रजिस्ट्रेशन याच फ्लॅटच्या पत्त्यावर करण्यात आलं आहे. ईडीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दोषी समजले जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकरणी सध्या ईडी आणि CBI मार्फत तिची चौकशी केली जात आहे.