24 September 2020

News Flash

ड्रग्स प्रकरण: लवकरच सारा अली खानला पाठवले जाऊ शकते समन्स

सुशांतच्या पवना फार्म हाऊसवर चालायच्या पार्ट्या...

सारा आली खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सुशांत सिंह राजपूत-रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील काही हाय-प्रोफाइल नावे समोर आली आहेत.  अमली पदार्थविरोधी विभागाच्या तपासात (एनसीबी) सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचे नाव आले आहे. एसीबी सुशांतच्या गेस्ट हाऊस आणि पवना डॅम जवळच्या बंगल्यात झालेल्या पार्ट्यांचा तपास करत आहे.

सारा, रकुल आणि सिमोन या तिघांना हजर होण्यासाठी अजून समन्स बजावलेले नाही असे एनसीबीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. सारा, रकुल आणि सिमोन या तिघांचीही  चौकशी होऊ शकते. “अजूनपर्यंत समन्स बजावलेले नाही. पण पुढच्या काही दिवसात समन्स पाठवले जाऊ शकते” असे एनसीबीच्या उपसंचालकांनी सांगितले.

आणखी वाचा- रिया ड्रग्ज प्रकरण : सारा, रकुलसोबत बॉलिवूडमधील आणखी दोन प्रसिद्ध नावं चर्चेत

सुशांतसोबत त्याच्या स्टाफमधील दीपेश सावंत, सॅम्युल मिरांडा, शोविक चक्रवर्ती आणि एनसीबीच्या अटकेत असलेला ड्रग पेडलर अनेक वेळा या फार्म हाऊसवर आले होते. रियाने तिच्या जबानीत सारा, सिमॉन आणि रकुलचे नाव घेतले आहे. त्या आधारावर तपास पुढे जाईल असे एनसीबीकडून सांगण्यात आले. पवना डॅम जवळच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अन्य लोकांवरही एनसीबी लक्ष ठेवून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:05 pm

Web Title: rhea named sara ali khan rakul preet during drug probe no summons sent yet ncb dmp 82
Next Stories
1 कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…
2 ५ मिनिटाच्या भेटीत अक्षयला मिळाले होते ३ चित्रपट, पण ठरले फ्लॉप
3 ‘सिंगिंग स्टार’च्या सेटवर रंगणार सुरांची मैफील; कार्यक्रमात होणार अजय-अतुलची एण्ट्री
Just Now!
X