27 February 2021

News Flash

अजब लग्नाची गजब गोष्ट

कोणत्याही प्रेयसीबरोबर लग्न न करता थेट आपल्या प्रियकराबरोबर लग्न केले.

इंस्टाग्रामवरील छायाचित्रं, ट्विटरवरील टिवटिव, नाइट पाटर्य़ामधून मद्यधुंद अवस्थेत केलेले धिंगाणे, कास्टिंग काउच आणि अभिनेत्रींनी केलेले लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप यामुळे सातत्याने चर्चेत राहणारा ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक रिकी मार्टिन गेले बरेच दिवस माध्यम चर्चेपासून दूर होता. परंतु त्याच्या लग्नामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. आजवर अनेक स्त्रियांबरोबरच्या त्याच्या अनैतिक संबंधांच्या कथा हॉलीवूड अभिनयसृष्टीत गाजल्या आहेत. त्यामुळे रिकीने गुपचूप कोणत्या अभिनेत्रीबरोबर लग्न केले याबाबत अनेकांना उत्सुकता होती, परंतु त्याने कोणत्याही प्रेयसीबरोबर लग्न न करता थेट आपल्या प्रियकराबरोबर लग्न करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

समलैंगिक रिकी मार्टिनने ३३ वर्षीय स्वीडिश अभिनेता जेवान योसेफबरोबर लग्न  केले. पत्रकार परिषद घेऊन त्याने आपल्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांना दिली. लग्न अगदी घाईगडबडीत झाल्यामुळे नातेवाईक व मित्रमंडळींना आमंत्रण देण्याची संधी त्याला मिळाली नाही, परंतु लवकरच एक शानदार पार्टी देऊन तो सर्वाची नाराजी दूर करणार आहे.  गेले वर्षभर जेवानबरोबरी त्याच्या संबंधांच्या चर्चा वृत्तमाध्यमांतून रंगत होत्या, परंतु त्याच्यावर अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचे होणारे आरोप पाहता त्यातून मुक्त होण्यासाठी त्याने केलेला तो एक पब्लिसिटी स्टंट आहे असे अनेकांना वाटत होते. परंतु आता लग्नच करून आपण समलैंगिक असल्याचे त्याने जाहीर केले आहे. सध्या मार्टिनच्या लग्नावर समाजमाध्यमातून जोरदार शेरेबाजी सुरू आहे. काहींनी त्याचे तोंडभरून कौतुक केले तर काहीजणांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:45 am

Web Title: ricky martin and jwan yosef are married hollywood katta part 95
टॅग : Hollywood Katta
Next Stories
1 जॉनी डेपचे पालथ्या घडय़ावर पाणी
2 २५ जानेवारीला करणी सेनेचा भारत बंद
3 ही तर बाप्पांना भेटण्याची आणखी एक संधी – संजय खापरे
Just Now!
X