News Flash

अमिताभ बच्चन यांच्यामुळेच माझ्यासारख्यांना काम मिळतंय- ऋषी कपूर

या चित्रपटाच्याच पार्श्वभूमीवर ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे.

ऋषी कपूर

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल २७ वर्षांनंतर ऋषी आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले असून या स्क्रिनिंगला रणबीर कपूर आणि अमिताभ यांच्या सासूबाई उपस्थित होत्या. या चित्रपटाच्याच पार्श्वभूमीवर ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे.

उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामध्ये वडील आणि मुलगा यांच्या नात्यातील सुंदर गुंफण या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे. ऋषी कपूर एक उत्तम अभिनेता असल्याबरोबरच ते स्पष्टवक्तादेखील आहेत. ‘या चित्रपटाची कथा रंजक असून अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रिन शेअर करणे ही खरंच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अमिताभजी एक उत्तम कलाकाराबरोबरच एक शिस्तप्रिय अभिनेतेदेखील आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. विशेष म्हणजे अमिताभ यांच्यामुळे या वयातही माझ्यासारख्या कलाकारांना चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळते’, असं देखील ते म्हणाले.

‘१०२ नॉट आऊट’मुळे २७ वर्षांनंतर अमिताभ आणि ऋषी एकाच चित्रपटात झळकणार आहेत. अजुबा या चित्रपटामध्ये ते एकत्र झळकले होते. त्यानंतर ते ‘१०२ नॉट आऊट’मध्ये पुन्हा आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:36 pm

Web Title: rishi kapoor amitabh bachchan 102 not out
Next Stories
1 एकता कपूर घेऊन येणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं देसी व्हर्जन?
2 माहिती प्रसारण मंत्रालयावर संतापले मराठी कलाकार
3 शाही विवाहसोहळ्याचा वाद चव्हाट्यावर; लग्न मोडण्यासाठी मेगनच्या भावाने लिहिलं खळबळजनक पत्र
Just Now!
X