News Flash

Photo : ऋषी कपूर यांनी दिला ‘या’ आगळ्यावेगळ्या शस्त्राच्या पूजेचा सल्ला

ऋषी कपूर यांनी शेअर केलेला हा फोटो पाहाच!

ऋषी कपूर

दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियावर त्यांच्या विनोदबुद्धीसाठीही नेहमी चर्चेत असतात. दसऱ्यानिमित्त त्यांच्या विनोदी स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा नेटकऱ्यांना आली. ऋषी कपूर यांनी चाहत्यांना विजयादशमीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरवर ओपनरचा फोटो शेअर केला आहे. हळद-कुंकू वाहून ओपनरची पूजा केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अशी शस्त्र जबाबदारीनं वापरण्याचा सल्लाही ऋषी कपूर यांनी दिला आहे. त्यांच्या विनोदबुद्धीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : सेम टू सेम! भाऊ कदमसोबत असलेल्या ‘या’ व्यक्तीला ओळखलंत का?

११ महिने व ११ दिवस परदेशात कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले आहेत. गेल्या वर्षी त्यांना कॅन्सरचं निदान झालं आणि त्यानंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले. पत्नी नीतू कपूर या संपूर्ण काळात त्यांच्यासोबत होती. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही न्यूयॉर्कमध्ये त्यांची भेट घेतली. कॅन्सरमुक्त होऊन भारतात परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी फोटोशूटसुद्धा केलं.

लवकरच ते ‘झूठा कहीं का’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर ते लागोपाठ तीन चित्रपटांची शूटिंग करणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये असतानाच त्यांनी हे चित्रपट साइन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:38 pm

Web Title: rishi kapoor said to use this weapon responsibly watch photo ssv 92
Next Stories
1 विकी कौशललाही भावले सोनालीच्या ‘हिरकणी’चे गाणे
2 एमएमएस लिक झाल्याने नैराश्यात गेली होती ही अभिनेत्री
3 कॅमेरामन व धावपटूंची ‘अनोखी’ शर्यत, बीग बींनी शेअर केलेला हा व्हिडीओ पहाच
Just Now!
X