22 February 2020

News Flash

रितेश-जेनेलिया घेणार राजकारणातील या मोठ्या व्यक्तीची मुलाखत

या मुलाखतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

रितेश देशमुख-जेनेलिया डिसूझा देशमुख

बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख हे राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची सपत्नीक मुलाखत घेणार आहेत. ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत ते घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही मेगामुलाखत रंगणार आहे.

१४ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल.

दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीत मिळणार आहेत.

First Published on February 12, 2020 6:22 pm

Web Title: riteish deshmukh genelia dsouza deshmukh to interview ex cm of maharashtra ashok chavan and his wife ssv 92
Next Stories
1 …त्या अपमानानंतर आमिर खानने कधीच केलं नाही अमरीश पुरी यांच्यासोबत काम
2 विजय देवरकोंडा पहिल्याच बॉलिवूडपटात ‘या’ स्टारकिडशी करणार रोमान्स
3 गणेश आचार्यनंतर आणखी एका बॉलिवूड कलाकारावर विनयभंगाचा गुन्हा