करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. अनेकांना ऑक्सिजन आणि बेड्स मिळतं नाही आहेत. एवढंच नाही तर रेमडेसिवीर लसींचा तुटवडा जाणवत असल्याने या लसींचा काळाबाजार सुरु झाला आहे. यासगळ्या गोष्टीला पाहुन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट रिट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने औषधांचा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर संताप व्यक्त केला आहे. ‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’, असे ट्वीट रितेशने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नागपुरमध्ये एका करोना बाधित रुग्णाला रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्याऐवजी त्याला अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सारख्या अनेक घटना समोर येत आहेत. करोनच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रात होणारा काळाबाजार पाहून रितेशला देखील भावना आवरणं कठीण झालं. अशी कृत्य करणाऱ्यांना चोप देणं गरजेचं असल्याचं तो ट्विटमध्ये म्हणालाय.

दरम्यान, रितेश व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी औषधे आणि ऑक्सिजनच्या होणाऱ्या काळाबाजारावर संताप व्यक्त केला आहे. या आधी अभिनेत्री रवीना टंडनने ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवत, औषधांच्या काळाबाजाराव संताप व्यक्त केला.