News Flash

रितेश देशमुखने अक्षयकुमारची नक्कल केलेला व्हिडीओ पाहिलात का??

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शोकडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच शोमध्ये ‘मर जावा’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. सर्वच कलाकारांनी कपिल शर्मासोबत शोमध्ये धमाल केली. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख.

रितेश सतत त्याच्या मस्तीखोर वागण्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो. मग तो चित्रपटातील सीन असो किंवा चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान केलेली मस्ती असो. रितेश सतत मस्ती करतच असतो. नुकताच कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कपिल शर्मा शोमधील हजेरी लावलेल्या ‘मर जावा’ चित्रपटाच्या टीमने प्रमोशनदरम्यान सेटवर केलेल्या मस्तीचा आहे. व्हिडीओमध्ये रितेश देशमुखने अक्षय कुमारची नक्कल करत असल्याचे दिसत आहे. अक्षयच्या स्टाईलमधील रितेशचे चालणे पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट पसरली आहे. व्हिडीओमध्ये रितेश देशमुखने अक्षयची केलेली नक्कल पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही.

आणखी वाचा : ‘राधे’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ आमनेसमाने, सलमान-अक्षयमध्ये टक्कर

निखिल अडवाणी निर्मित ‘मर जावां’ चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे कथानक प्रेमकथेवर आधारित असून हा चित्रपट पुढील वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ-रितेशसोबत अभिनेत्री तारा सुतारियादेखील स्क्रिन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:09 pm

Web Title: riteish deshmukh imitates akshay kumars style of greeting fans in a hilarious new clip avb 95
Next Stories
1 Photo : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलं बाथटबमध्ये टॉपलेस फोटोशूट
2 अक्षयकुमारनं मानधन वाढवल्याची चर्चा; आकडा ऐकून बसेल धक्का!
3 आमिरमुळे जुहीने गमावला ‘राजा हिंदुस्थानी’
Just Now!
X