भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका खिशात घातली. अनेक आव्हानांचा सामना करत भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने देखील भारत झिंदाबाद म्हणत आपला आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

“भारत झिंदाबाद. भारतीय क्रिकेट संघावर मला गर्व आहे. हा खूप मोठा विजय आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे तुचं अभिनंदन.” अशा आशयाचं ट्विट करत रितेशने आपला आनंद व्यक्त केला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा- मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे.