03 December 2020

News Flash

केदारनाथ मंदिराचा नयनरम्य देखावा; रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओची होतेय चर्चा

पाहा, रितेशने शेअर केलेला व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा सोशल मीडियावर चांगलाच वावर आहे. त्यामुळे अनेकदा रितेश त्याच्या जीवनातील किंवा त्याला आवडलेल्या गोष्टी इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर या सारख्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. यामध्येच त्याने केदारनाथ मंदिराचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अचंबित झाले असून मंदिराचा हा नयनरम्य देखावा प्रत्येकाच्या पसंतीत उतरत आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केदारनाथ मंदिर आणि आजूबाजुचा परिसर दिसत आहे. विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत सुंदर असून तो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. मंदिराकडे जात असताना शांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या आवाजात आरतीचा आवाज घुमत आहे.


‘केदारनाथ मंदिर, अत्यंत सुंदर. ओम नम:शिवाय’, असं कॅप्शन रितेशने या व्हिडीओला दिलं आहे. आता पर्यंत हा व्हिडीओ जवळपास ५ लाख लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, रितेश कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी केदारनाथ मंदिराचा फोटो शेअर करुन त्याने अनेकांचं लक्ष वेधल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 1:26 pm

Web Title: riteish deshmukh shares beautiful video of kedarnath temple says breathtakingly beautiful ssj 93
Next Stories
1 दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितल्यावर सैफच्या प्रतिक्रियेवर करीना म्हणाली; “दुर्दैवाने घरात …”
2 अष्टमीच्या निमित्ताने तेजस्विनीची मार्मिक पोस्ट
3 सैफने सांगितला पतौडी पॅलेसवर करीना व मुलांसोबत राहण्याचा प्लॅन
Just Now!
X