21 September 2020

News Flash

रितेशने शेअर केला सिंहिणीचा ‘तो’ व्हिडीओ अन्….

हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयामधील आहे

इंटरनेटवर अनेकदा काही हटके व्हिडीओ धुमाकूळ घातल असतात. त्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष चर्चिले जातात. यामध्येच सध्या एका सिंहिणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यात एक सिंहीण मोठ्या ताकदीने ४-५ माणसांना दोरखंड खेचण्याच्या शर्यतीत हरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर एका सिंहिणीचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयामधील आहे. यात काचेच्या पलिकडे काही माणसे उभी असून त्यांच्या हातात एक दोरखंड आहे. या दोरखंडाचं दुसरं टोक सिंहिणीच्या जबड्यात असून ती मोठ्या शर्थीने हा दोरखंड खेचत आहे. तर तिच्याप्रमाणेच काचेपलिकडे असलेले लोकही तो दोरखंड मोठ्या ताकदीनिशी खेचत आहेत. हा व्हिडीओ रितेशने शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Singham

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

एका मुक्या जनावरासोबत असं अमानवीय कृत्य करणं चुकीचं असून त्याचे व्हिडीओ शेअर करणं हे एखाद्या दिग्गज कलाकाराला शोभत नाही असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच अनेकांनी रितेश तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सिंहिणीच्या धाडसाचं आणि जिद्दीचं कौतूक केलं आहे. तर अनेकांनी एका मुक्या जनावरासोबत असं वागणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओ संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:52 pm

Web Title: riteish deshmukh shares viral video ssj 93
Next Stories
1 राम मंदिर भूमिपूजन : कोणत्याही प्रकारची कट्टरता टाळणं हे आपलं कर्तव्य !
2 सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीला का वाचवताय? पायल रोहतगीचा मुंबई पोलिसांना सवाल
3 अभिनेता म्हणून फ्लॉप ठरला होता सुशांत-साराला लाँच करणारा दिग्दर्शक
Just Now!
X