18 January 2021

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कल्पनारम्य नसेल, तर… -रितेश देशमुख

शिवाजी महाराजांचे आयुष्य जस आहे तसच चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत

गेल्या कही दिवसांपासून अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवजयंतीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नुकताच रितेशने एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाशी संबंधीत वक्तव्य केले आहे.

नुकताच रितेशने ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर रितेशने ‘आम्ही आता फक्त चित्रपटाची घोषणा केली आहे. पण या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. यापूर्वीही आम्ही चित्रपटाची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने त्यावेळी काही गोष्टींमुळे चित्रपट होऊ शकला नाही. आता हा चित्रपट करताना खूप मेहनत घ्यावी लागली’ असे रितेश चित्रपटाच्या तयारी बाबत विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला.

PHOTO: विराटचं घर नव्हे हा तर ‘विराट महाल’, पाहा आतुन कसा दिसतो

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चित्रपट बनवण्यासाठी अनेक निकष आहेत. शिवाजी महाराज ही अशी व्यक्ती आहे की, त्यांच्या आयुष्यातील घटनांशी कसलीही छेडछाड करू शकत नाही. या गोष्टीला आम्ही कल्पनेने रंगवू शकत नाही. शिवाजी महाराजांचे आयुष्य जस आहे तसच चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यात भावनांचा विचार तर करणारच आहोत, त्याचबरोबर संशोधन करून उपलब्ध ऐतिहासिक साहित्यात जे सांगितले आहे. त्याला अनुसरूनच चित्रपट बनवणार आहोत असे रितेश म्हणाला.

पाहा : ‘या’ अभिनेत्रींचे वय माहित आहे का? वाचून बसेल धक्का!

त्यानंतर रितेशला चित्रपटाच्या बजेट विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने, ‘इतक्या मोठ्या व्यक्तीवर चित्रपट काढणार तर चित्रपटाचे बजेट ही भारी-भक्कम असणार. माझ्या मते १५० कोटी खर्च करुन चांगले व्हिज्युअल दाखवणे गरजेचे नाही. काही वेळा असे देखील झाले आहे एखाद्या चित्रपटाचे कमी बजेट आहे पण त्याचे व्हिज्युअल्स १०० कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटापेक्षा चांगले आहेत’ असे रितेश म्हणाला.

शिवाजी महाराजांच्या चित्रपट हा तीन टप्प्यांमध्ये मांडला जाणार असल्याची शक्यता आहे. कारण नागराजने चित्रपटाची घोषणा करताना शेअर केलेल्या टीझरमध्ये ‘शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी’ असा उल्लेख केला आहे. या चित्रपटाची निर्मिती नागराजच्या आटपाट प्रोडक्शन आणि रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२१ साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 12:24 pm

Web Title: riteish deshmukh talks about the biopic of chhatrapati shivaji maharaj avb 95
Next Stories
1 ‘या’ ठिकाणी गेलं भाऊ कदमचं बालपण; मुंबईतील ही जागा ओळखलीत का?
2 ‘कमिना’ म्हणत पत्रकाराने केला रणवीरचा अपमान
3 केतकी चितळेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
Just Now!
X