सध्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चांगलाच ट्रेण्ड होतोय. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनेही हे आव्हान स्वीकारत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी अक्षरश: हा व्हिडीओ डोक्यावर उचलून धरला आहे. आता अभिनेता रितेश देशमुखने अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडिवर मजेशीर अंदाजात शेअर केला आहे.
‘बॉटल कॅप चॅलेंज’मध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचे झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असे करताना ती बॉटल खाली पडली नाही पाहिजे. अक्षय कुमारने हे चॅलेंज पूर्ण केले आहे.
अक्षय कुमारचा हा व्हिडीओ रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर मजेशीर अंदाजात शेअर केला आहे. ‘हे करण्यापासून मी पण स्वत:ला रोखू शकलो नाही. हा माझा अक्षय कुमारचा मास्क लावून बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करताना व्हिडीओ आहे. सावध रहा हा व्हिडीओ त्याचा असल्याचा दावा अक्षय कुमार करु शकतो. एक चांगला मित्र म्हणून मी अक्षयला रोखू शकत नाही’ असे त्याने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले आहे.
I couldn’t resist either!!!
That’s my #bottlecapchallange with an @akshaykumar mask… beware he may claim it’s him…. as a good friend I will allow him that much !!! My next challenge video is with a @iTIGERSHROFF mask… pic.twitter.com/gGb0Na56c7— Riteish Deshmukh (@Riteishd) July 3, 2019
रितेश इतक्यावर थांबला नाही तर ‘माझा पुढचा व्हिडीओ अभिनेता टायगर श्रॉफच्या मास्कमध्ये असेल’ असे पुढे त्याने लिहिले होते. दरम्यान हा व्हिडिओ रितेशने टायगरला टॅगही केला आहे.
‘बॉटल कॅप चॅलेंज’ हॉलिवूड अभिनेत्यांपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत सर्वजण स्वीकारत आहेत आणि या चॅलेंजचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.