News Flash

Video : तेजस्वी प्रकाशवर भडकला रोहित शेट्टी, जाणून घ्या कारण

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस १३’ या शो नंतर आता ‘खतरों के खिलाडी पर्व १०’ चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे तेजस्वी प्रकाशने. बऱ्याच वेळा रोहित शेट्टी तिची खिल्ली उडवताना दिसतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित तेजस्वीवर चिडलेला दिसत आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खतरों के खिलाडी शोचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रोहित तेजस्वीवर भडकला असून ती तिच्या मर्यादा ओलांडत आहे असे बोलताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्वीने रोहितवर स्पर्धकांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. प्रत्येक टास्कमध्ये रोहित अमृताला सवलत देत असल्याचे तेजस्वीचे म्हणणे आहे. खरतर तेजस्वी हे मस्करीमध्ये बोलत असते. पण तिचे बोलणे रोहितला आवडत नाही आणि तो रागात मर्यादेत रहा असे तिला म्हणतो.

Video : भारती सिंहच्या पतीने दुसऱ्या लग्नासाठी अभिनेत्रीला केलं प्रपोज

आणखी वाचा : …म्हणून अमृता खानविलकरचा बिग बॉसला नकार

खतरों के खिलाडी पर्व १०मध्ये करिश्‍मा तन्‍ना, राणी चॅटर्जी, करण पटेल, आरजे मलिष्‍का, अदा खान, श‍िविन नारंग, धर्मेश येलांदे, बलराज स्‍याल, तेजस्‍वी प्रकाश, अमृता खानविलकर यांनी सहभाग घेतला आहे. तसेच शोमध्ये अभ‍िषेक वर्मा, स्‍मृति कालरा, सलमान यूसुफ खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, बीर मायरा पाहुणे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 6:39 pm

Web Title: rohit shetty angry on tejaswi prakash avb 95
Next Stories
1 अमिताभ बच्चन म्हणतात मी पेट्रोल पंपावर गेलो अन्…
2 रेखा-काजोलच्या ‘त्या’ फोटोमुळे उंचावल्या होत्या सर्वांच्याच भुवया
3 कार्तिकने रिप्लायसाठी चाहत्याकडे केली ‘एक लाख’ रुपयांची मागणी
Just Now!
X