News Flash

रोहितकडून शाहरूखला सायकल भेट

चित्रपटकर्ता रोहित शेट्टीने 'दिलवाले' या त्याच्या चित्रपटातील अभिनेता शाहरूख खानला सायकल भेट म्हणून दिली आहे. सध्या ते बल्गेरियामध्ये 'दिलवाले' चित्रपटाचे शुटिंग करत आहेत.

| June 16, 2015 02:17 am

srk-kajol-dilwale-759चित्रपटकर्ता रोहित शेट्टीने ‘दिलवाले’ या त्याच्या चित्रपटातील अभिनेता शाहरूख खानला सायकल भेट म्हणून दिली आहे. सध्या ते बल्गेरियामध्ये ‘दिलवाले’ चित्रपटाचे शुटिंग करत आहेत. गेल्याच महिन्यात शाहरूखच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सायकलिंगद्वारे गुढघ्यावरील शस्त्रक्रियेतून लवकर बरे होता येईल, अशी भावना शाहरूखने व्यक्त केली आहे. रोहितने दिलेल्या या गिफ्टबाबत शाहरूखनेदेखील टि्वटरवर पोस्ट टाकले आहे. शुटिंगच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असून हॉटेलच्या लॉबीमध्ये पियानो वाजत असल्याचे सांगत गुडघा लवकर बरा होण्यासाठी रोहितने सायकल गिफ्ट दिल्याचा उल्लेख त्याने या पोस्टमध्ये केला आहे. २१ मे रोजी शाहरूखच्या डाव्या गुढघ्यावर मुंबईमध्ये अर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २०१३ साली आलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या अॅक्शन-कॉमेडीपटानिमित्त एकत्र आलेले शाहरूख खान आणि रोहित शेट्टी ‘दिलवाले’ चित्रपटात परत एकदा तोच करिश्मा दाखविण्यासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटात काजोल, वरुण धवन, किर्ती सनोन यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2015 2:17 am

Web Title: rohit shetty gifts bicycle to dilwale actor shah rukh khan
टॅग : Rohit Shetty
Next Stories
1 मालिकांच्या यशासाठी जुन्या चेहऱ्यांना पसंती
2 ‘ढोल ताशे’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री ऋषिता भट
3 दक्षिणात्य निधीची मराठीत धम्माल
Just Now!
X