बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट साकारला जाणार असून, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जातेय.

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी नवाजच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे कळते. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटांमधील दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवाजने मात्र याविषयी फार काही माहिती देण्यास नकार दिला असून, याविषयीची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहण्याचे त्याने आवाहन केले.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

रिचर्ड एटनबोरा यांच्या ‘गांधी’ आणि जस्टिन चॅड्वीक यांच्या ‘मंडेला: लाँग वॉक टू फ्रिडम’ या पुस्तकांपासून प्रेरणा घेत खासदार, शिवसेना प्रवक्ते आणि चित्रपटाचे लेखक संजय राऊत यांनी हा चित्रपट साकारण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जातेय. ‘बाळासाहेबांच्या आयुष्याची बरीच वर्षे जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मोठ्या पडद्यावर मांडले जावेत’, असे राऊत म्हणाले. जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेबांचा संघर्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा चित्रपट साकारला जातोय.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

२१ डिसेंबरला या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणार असून, त्या कार्यक्रमाला बिग बी अमिताभ बच्चन यांची विशेष उपस्थिती लावणार असल्याचे कळते. तेव्हा आता या चित्रपटातून शिवसेनाप्रमुख एका अनोख्या मार्गाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हणायला हरकत नाही.