26 September 2020

News Flash

‘जेव्हा दाजी येतात घरी’; सई, प्रार्थनाने घेतली सोनालीच्या होणाऱ्या पतीची भेट

पाहा या खास भेटीचे फोटो

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवशी चाहत्यांना एक सरप्राइज दिलं. हे सरप्राइज म्हणजे, तिच्या साखरपुड्याची बातमी. २ फेब्रुवारी रोजी दुबईत सोनालीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर लॉकडाउनमुळे ती काही दिवस तिथेच अडकली होती. आता गणेशोत्सवादरम्यान सोनालीचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर भारतात आला. सोनालीने हीच संधी साधत तिच्या सर्व मित्रमैत्रिणींची भेट कुणालशी करून दिली आहे. दुबईत पार पडलेल्या साखरपुड्याला सोनालीचे कलाविश्वातील मित्र-मैत्रिणी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे आता सई ताम्हणकर, प्रार्थना बेहरे, फुलवा खामकर या सोनालीच्या मैत्रिणींनी कुणालची भेट घेतली.

सई आणि प्रार्थनाने याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जेव्हा दाजी येतात घरी, असं कॅप्शन देत सईने कुणालसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सई, कुणाल आणि सोनाली हे तिघंजण पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहरे व तिच्या पतीनेसुद्धा सोनाली व कुणालची खास भेट घेतली. या भेटीदरम्यानचा सेल्फीसुद्धा प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट केला.

२ फेब्रुवारी रोजी दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सोनाली व कुणालचा साखरपुडा पार पडला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 9:44 am

Web Title: sai tamhankar and prarthana behere met sonalee kulkarni fiance kunal benodekar ssv 92
Next Stories
1 त्यावेळी चित्रपटसृष्टीत मराठी लोकांना घाटी संबोधलं जायचं : उर्मिला मातोंडकर
2 दिया मिर्झाचा जया बच्चन यांना पाठिंबा; म्हणाली…
3 सुशांत सिंह प्रकरण : फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सारा अली खानची उपस्थिती; मॅनेजरचा खुलासा
Just Now!
X