30 October 2020

News Flash

सई मांजरेकरचा अस्सल मराठमोळा लूक; सेलिब्रिटींनाही घातली भुरळ

'दबंग ३' या चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सई मांजरेकर

‘दबंग ३’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो, व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात आणि चाहत्यांकडून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडतो. नुकताच तिने नऊवारी साडीतला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमधील सईचा अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झाले आहेत.

नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर टिकली, झुमके असा पारंपरिक वेश तिने केला आहे. एका लग्नात जाण्यासाठी सईने ही सर्व तयारी केली आहे. सईने आईसोबतचाही एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मेधा मांजरेकरसुद्धा मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकर, क्रांती रेडकर यांनीसुद्धा कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम रुपालीने पुण्याच्या मॉलमध्ये ‘त्या’ खास व्यक्तीला केलं प्रपोज

सईने पहिल्याच चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. ‘दबंग ३’मध्ये तिने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला पण सईच्या अभिनय कौशल्याची चर्चा सर्वत्र झाली. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सई सलमानसोबत दिसली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 5:28 pm

Web Title: saiee manjrekar navvari saree look winning hearts on internet ssv 92
Next Stories
1 आदित्य आणि नेहाच्या लग्नामुळे उदीत नारायण यांना होणार हा फायदा?
2 ‘बिग बॉस मराठी’ फेम रुपालीने पुण्याच्या मॉलमध्ये ‘त्या’ खास व्यक्तीला केलं प्रपोज
3 नैराश्यामुळे आलियाच्या बहिणीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X