11 December 2017

News Flash

‘गॉसिपला घाबरू नकोस…’ सैफचा साराला सल्ला

कोणत्याही ताऱ्याची तुलना दुसऱ्यासोबत केली जाऊ शकत नाही

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 5:29 AM

सारा अली खान, सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान सध्या सर्वात व्यग्र अभिनेता आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का? त्याचा तर ‘शेफ’ हा एकच सिनेमा प्रदर्शित होत आहे. पण त्याचे खासगी आणि व्यावसायिक आयुष्य पाहिले तर लक्षात येईल एकीकडे त्याचा ‘शेफ’ सिनेमा प्रदर्शित होत आहे तर दुसरीकडे त्याची मुलगी सारा तिच्या ‘केदारनाथ’ या पदार्पणाच्या सिनेमाचे चित्रीकरण करते आहे. त्याची बायको करिना कपूर खानही ‘वीरे दी वेडिंग’मध्ये व्यग्र आहे तर मुलगा तैमुरची काळजीही त्याला घ्यावी लागते. हे सर्व कमी की काय आता बहिणीला मुलगी झाल्यामुळे तिथेही तो लक्ष देतो. आता पटलं ना की बॉलिवूडमधला सध्याच्या घडीला सर्वात व्यग्र अभिनेता त्याला का म्हटलं जातं.

पण या सगळ्यात त्याचे मुलांकडचे लक्ष कमी झालेले नाही. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने साराबद्दल सांगताना म्हटले की, ‘अनावश्यक स्पर्धा आणि गॉसिप करुन घाबरवणाऱ्यांना अजिबात न घाबरण्याचा सल्ला मी तिला दिलाय. सारा फार मेहनती आणि शांत स्वभावाची संस्कारी मुलगी आहे. तिचे पालन पोषण फार चांगल्या पद्धतीने झाले आहे. सगळ्यांनाच तिचा स्वभाव फार आवडतो. मला विश्वास आहे की ती सिनेसृष्टीत चांगलं काम करेल. ‘केदारनाथ’ टीमसोबत तिचे सध्या काम सुरु असून, ती एक सर्वोत्तम टीम आहे. सुशांत सिंग राजपूत एक चांगला अभिनेता असून अभिषेक कपूरही फार उत्तम दिग्दर्शक आहे.’

सैफ साराला नेहमी सांगतो की, ‘काम करणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जो प्रवास असतो, त्या प्रवासात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलतात. या गोष्टी ऐकून विचलित व्हायचं नाही. लोकं गॉसिप करतच राहणार, वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करणार पण त्यामुळे निराश व्हायचे नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं.’

तो म्हणाला की, ‘आकाशात जसे लाखो तारे असतात. कोणत्याही ताऱ्याची तुलना दुसऱ्यासोबत केली जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतही कोणाच्याही कामाची तुलना दुसऱ्यासोबत करता येऊ शकत नाही. तूही सिनेसृष्टीतील एक तारा आहेस आणि तुला कोणासोबतही स्पर्धा करण्याची गरज नाही. तुझ्यात जे वेगळेपण आहे ते फक्त जगाला दाखवण्याची गरज आहे.’

सैफच्या आगामी ‘शेफ’ सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर येत्या ६ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘एअरलिफ्ट’ सिनेमाचा दिग्दर्शक राजा कृष्णा मेनने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सैफसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मप्रिया जानकीरमन, दानिश कार्तिक, दिनेश प्रभाकर, चंदन रॉय सन्याल आणि नेहा सक्सेना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात करिना कपूर पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

First Published on October 5, 2017 5:25 am

Web Title: saif ali khan advised his daughter sara ali khan chef kedarnath