20 October 2020

News Flash

पहिल्यांदाच नागा साधूच्या रुपात दिसणार सैफ

'फॅण्टम' या चित्रपटातील थरारक भूमिकेपासून सैफच्या वाट्याला नव्या आणि आव्हानात्मक भूमिका यायला लागल्या आहेत.

सैफ अली खान

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेकवेळा चॉकलेट बॉयच्या भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या वाट्याला सध्या नवनव्या भूमिका येतांना दिसत आहे. या नव्या भूमिकांमुळे प्रेक्षकांसमोर एक नवीन सैफ दिसून येत आहे. इतकंच नाही तर या नव्या धाटणीच्या भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे सैफदेखील उत्साहित असल्याचं पाहायला मिळतं. ‘फॅण्टम’ या चित्रपटातील थरारक भूमिकेपासून सैफच्या वाट्याला नव्या आणि आव्हानात्मक भूमिका यायला लागल्या आहेत. याच दरम्यान सैफच्या वाट्याला अशीच एक आव्हानात्मक भूमिका आली असून यात तो नागा साधूच्या रुपात दिसणार आहे.

गेल्या काही दिवसापासून सैफ त्याच्या लूककडे प्रकर्षाने लक्ष देत असून त्याने केस आणि दाढी वाढविल्याचं पाहायला मिळतंय. त्यांमुळे सैफ त्याच्या आगामी चित्रपटासाठी ही तयारी करत असल्याचा एकंदरीत अंदाज बांधण्यात आला होता. मात्र आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून सैफने त्याच्या आगामी चित्रपटासाठीच लूक बदल्याचं समोर आलं आहे. सैफच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘हंटर’ असण्याची शक्यता असून यात त्याला आव्हानात्मक अशी नागा साधूची भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे त्याने या चित्रपटासाठी होकार दिला आहे.

आगामी ‘हंटर’ हा चित्रपट १७८० च्या काळावर आधारित असून पहिल्यांदाच सैफ अशा आगळ्यावेगळ्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी सैफ उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. ‘या चित्रपटाविषयी जास्त विचार करु नका. नागा साधूचा अर्थ साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये माझा लूक कोणता असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या चित्रपटामध्ये मी ज्या साधूची भूमिका साकारणार आहे तो साधू सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठला आहे’, असं सैफने सांगितले.

दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून राजस्थानच्या भर उन्हामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सैफला त्याचे कान टोचावे लागल्याचं पाहायला मिळत असून त्याच्या मेकअपसाठी तब्बल २ तास लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 11:45 am

Web Title: saif ali khan is going to be a naga sadhu
Next Stories
1 कोण म्हणतं रणबीरच्या प्रेयसीसोबत कतरिनाचा वाद आहे?
2 ‘या’ मराठमोळ्या भावंडांनी साकारला पडद्यावरचा ‘संजू’
3 FIFA World Cup 2018 FINAL : बॉलिवूड म्हणतंय, ‘फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला तर क्रोएशियाने मनं’
Just Now!
X