12 December 2017

News Flash

नवाब सैफ अली खानची मालमत्ता वाचून तुम्हीही व्हाल थक्क

गाड्यांचाही फार मोठा ताफा त्याच्या जवळ

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 7:21 PM

अभिनेता सैफ अली खान

या शुक्रवारी सैफ अली खानचा ‘शेफ’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्याचा ‘रंगून’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करु शकला नव्हता. पण आता त्याच्या या आगामी सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत. ‘शेफ’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो हे तर काही दिवसांमध्ये कळेलच. पण, त्याच्या खासगी आयुष्याकडे पाहिले तर सैफ नेहमीच नवाबी थाटात वावरताना आपल्याला दिसतो. तो पतौडी साम्राज्याचा १० वा नवाब आहे. त्याच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. सैफला गाड्यांचीही फार आवड आहे. त्याच्याकडे कोटींच्या घरातल्या अनेक गाड्याही आहेत.

सैफच्या पणजोबांची भोपाळमध्ये सुमारे ५००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पण सध्या या मालमत्तेबाबत विवाद सुरू आहेत. भोपाळमधील अधिकतर मालमत्तेवर सरकारची जप्ती आली असून त्यावर न्यायालयात खटला सुरू आहे. पण तरीही सैफची एकूण मालमत्ता जवळपास ७५० कोटी रुपये एवढी आहे.

सैफ, करिना आणि तैमुर अली खान

त्याला गाड्यांची फार आवड असल्यामुळे त्याच्याकडे अद्यावत सुविधांनीयुक्त अशा गाड्यांचा ताफा आहे. फोर्ड मस्टंग, लँड क्रुझर, लेक्सस ४७०, बीएमडब्ल्यू ७ सीरिज, रेंज रोवर, ऑडी आर ८ स्पायडर या गाड्यांसोबत अजूनही अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत. असे म्हटले जाते की, त्याने करिनाला साखरपुड्यात जी अंगठी घातली होती ती जवळपास २ कोटी रुपयांची होती.

करिना आणि सैफ अली खान

करिनासोबत लग्न करण्याआधी तो साधारणतः ६ कोटींच्या बंगल्यात राहायचा. पण लग्नानंतर तो खारमध्ये राहायला गेला. सैफकडे गाड्यांप्रमाणेच घडाळ्यांचेही फार मोठे कलेक्शन आहे. याशिवाय तो उत्तर गिटार वाजवतो. जेव्हाही त्याला गिटार वाजवण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात जायचे असते तेव्हा तो हार्ले डेव्हिडसनचे जॅकेट वापरतो. या जॅकेटची किंमत साधारणपणे एक ते दीड लाख रुपये आहे. तसेच सैफ एका सिनेमाचे सहा ते सात कोटी रुपये आणि जाहिरातींसाठी तीन ते चार कोटी रुपये घेतो.

First Published on October 5, 2017 7:21 pm

Web Title: saif ali khan networth car watches collection