News Flash

अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमा करण्यास नागराज मंजुळे सज्ज?

बॉलिवूडच्या शहेनशहासोबत काम करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते

अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे

नागराज मंजुळे हे नाव तसं संपूर्ण महाराष्ट्रालाच परिचयाचं आहे. पण महाराष्ट्राबाहेर ही त्यांना ओळख मिळाली ती म्हणजे ‘सैराट’ या सिनेमामुळे. या सिनेमाने अनेकांचे आयुष्य रातोरात बदलले. अनेकांना रातोरात स्टार करणारा हा अवलिया आता लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहेत. त्यांच्या पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन असणार आहेत.

शाहरुखने फ्रेंडशिप डेच्या दिवशी असा पाळला आमिरचा शब्द

बॉलिवूडच्या शहेनशहासोबत काम करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. पण नागराजच्या बाबतीत हे स्वप्न सत्यात उतरत आहे असेच म्हणावे लागले. या सिनेमाच्या संहितेवर नागराज गेल्या वर्षभरापासून काम करत होते. त्यांनी अमिताभ यांना ही कथा ऐकवली आणि बिग बींना ती पसंतही पडली. पण अजून बच्चन यांनी सिनेमासाठी होकार दिला नाही. येत्या काही दिवसांमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. पण अमिताभ बच्चन या सिनेमात काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. सगळ्या गोष्टी नियोजन केल्यानुसार झाल्या तर लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवातही होईल.

सामाजिक विषय प्रखरपणे मांडण्याची नागराजची खास शैली आहे. या सिनेमातूनही तो सामाजिक मुद्दाच घेऊन प्रेक्षकांसमोर येईल असे म्हटले जात आहे. नागराजचं दिग्दर्शन आणि अमिताभ यांचा अभिनय हा दुग्धशर्करा योग जुळून येईल असेच म्हणावे लागेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं होतं. हे यश एवढं मोठं होतं की या सिनेमाचे अन्य भाषांमध्येही रिमेक झाले. करण जोहरही या सिनेमाचा हिंदी रिमेक घेऊन येत आहे.

ही आहेत बॉलिवूडमधील रक्षाबंधनची सदाबहार गाणी

‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ आणि नंतर आलेला ‘सैराट’ या तीनही सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे नागराज मंजुळे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार असं आता समिकरणच बनून गेलं आहे. त्याचा हा चौथा सिनेमा नक्की कसा असेल याकडे आता त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:03 pm

Web Title: sairat director nagraj manjule ropes in amitabh bachchan for his debut bollywood project
Next Stories
1 सिनेनॉलेज : ‘जख्म’मध्ये अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?
2 माझ्या काकांमुळेच सिनेसृष्टीत टिकलो- इमरान हाश्मी
3 अमेय खोपकरमुळे संजय जाधवच्या चित्रपटाचे शीर्षक मराठीत?
Just Now!
X