मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘सैराट.’ या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या चित्रपटातील गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली होती. ‘सैराट’ चित्रपटात परश्याची भूमिका अभिनेता आकाश ठोसरने साकारली होती. या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता आकाश एका नव्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आकाश अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये आकाश एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आकाशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या सीरिजमध्ये आकाशसोबत अभिनेता अभय देओल, सुमित व्यास हे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही सीरिज २६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.