26 May 2020

News Flash

अरेच्चा! हा तर ‘सैराट’मधला परश्या; मेकओव्हरनंतर ओळखणंही झालं कठीण

आर्चीच्या प्रेमात वेडा झालेला 'सैराट'मधील परश्या आणि या फोटोमध्ये बराच फरक दिसून येत आहे.

आकाश ठोसर

फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशाला याड लावणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील परश्या व आर्चीची भूमिका प्रेक्षकांना कधीच विसरता येणार नाही. पहिल्याच चित्रपटात या दोन नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची भुरळ पाडली होती. या चित्रपटामुळे परश्याची भूमिका साकारलेला आकाश ठोसर व आर्चीच्या भूमिकेतील रिंकू राजगुरू हे रातोरात प्रसिद्ध झाले. ‘सैराट’नंतर आकाश ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात झळकला होता. मात्र त्यानंतर आकाशचा झालेला मेकओव्हर तुम्हालाही आश्चर्यचकित करणारा आहे. आकाश सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो थक्क करणारे आहेत.

आर्चीच्या प्रेमात वेडा झालेला ‘सैराट’मधील परश्या आणि या फोटोमध्ये बराच फरक दिसून येत आहे. 2016 मध्ये ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर आकाशने त्याच्या लूकमध्ये बराच बदल केला. गेल्या तीन वर्षांत त्याने फिटनेसवर फार भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ‘गर्ल्स’ चित्रपटाचा पोस्टर पाहून सलील कुलकर्णी संतापले

आकाशला फिटनेसची क्रेझ असून नुकताच त्याने लडाखमध्येही व्यायाम करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी व्यायाम करतो’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. वर्कआऊटचे बरेच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

आकाश लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘क्रश पॉईंट’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. इंडो-चीन वॉरवर ही सीरिज आधारित असून ‘हॉटस्टार’वर ती प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 3:15 pm

Web Title: sairat parshya akash thosar new look nagraj manjule ssv 92
Next Stories
1 Trailer : बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा ‘खारी-बिस्कीट’
2 ‘गर्ल्स’ चित्रपटाचा पोस्टर पाहून सलील कुलकर्णी संतापले
3 वयाची सत्तरी ओल्यांडल्यानंतरही कामाचा अट्टहास का?; बिग बी म्हणतात..
Just Now!
X