‘झिंगाट’मधलं एखादं गाणं सांग रे? असा प्रश्न जर कोणाला विचारला गेला तर आजही अनेकजण ‘झिंगाट…’ गाण्याचेच नाव घेतील. या गाण्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला वेड लावलं होतं. आजही हे गाणे कुठे लागले तर अनेकांची पावलं आपसूक या गाण्यावर थिरकतात. या गाण्याच्या वेडातून बॉलिवूडही अलिप्त राहिले नाही. ‘सैराट’चा अधिकृत रिमेक असलेल्या करण जोहरच्या आगामी ‘धडक’ सिनेमात ‘झिंग झिंग झिंगाट’चं हिंदी व्हर्जन दिसणार आहे.

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ‘धडक’मधील या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे धडकमधील झिंगाट कसं असेल याचकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. ‘धडक’ सिनेमात झिंगाटची धून वापरली जाणार असली तरी त्याचे बोल नक्की काय असतील याची उत्सुकता झिंगाटच्या चाहत्यांना आहे. अजय-अतुल यांनी सैराटमधील गाण्यांना संगीत दिलं होते. यापूर्वी अजय-अतुलच्या ‘कोंबडी पळाली’ या गाणाच्या चालीवर ‘चिकनी चमेली’ हे गाणे हिंदीत तुफान गाजले होते. त्यामुळे ‘झिंगाट’चे हिंदी व्हर्जन कसे असेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर्षी २० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली.