01 December 2020

News Flash

सलमान खानसह कुटुंबीयांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह, पण…

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानच्या कारचालकाला करोनाची लागण झाली. त्या पाठोपाठ घरात काम करणाऱ्या दोन व्यक्तींची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. आता त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची स्वॅब चाचणी निगेटीव्ह आली आहे. सलमान आणि त्याचे कुटुंबीय पुढचे १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘पिंकव्हिला’नुसार, सलमानच्या कारचालकाला करोनाची लागण झाल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरला करोना झाल्याचे समोर आले. या कर्मचाऱ्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस १४च्या विकेंडच्या भागामध्ये सलमान ऐवजी आता दुसरा एखादा बॉलिवूड कलाकार दिसण्याची शक्यता होती. पण आता चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे सलमान पुन्हा चित्रीकरण सुरु करु शकतो असे म्हटले जात आहे. सलमान बिग बॉसच्या विकेंटच्या भागात दिसणार की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान तो आगामी ‘राधे’ चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरु करु शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 6:07 pm

Web Title: salman khan and his family test negative for coronavirus avb 95
Next Stories
1 …अन् सुष्मिताने रिनेसमोर उघड केलं खऱ्या आई-वडिलांविषयीचं सत्य
2 लग्नाआधी बिग बींनी लिहिले होते लव्ह लेटर, केबीसीमध्ये सांगितला किस्सा
3 गौहरने झैदसोबत केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X